Home कोकण दिड महिन्यापासून परिसरात वाघाचे परिवाराचा मुक्त संचार, वनविभागाची डोळेझाक. राईसमिल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष...

दिड महिन्यापासून परिसरात वाघाचे परिवाराचा मुक्त संचार, वनविभागाची डोळेझाक. राईसमिल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आवारात वाढली जंगलसदृष झाडे कामगारावर वाघीणीचा हल्ला, वाघिणीचे हल्ल्यात, कामगार गंभीर जखमी.

169

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात अंदाजे दिड महिन्यापासून सिंदेवाही, लोनवाही, गडमौशी, जाटलापूर दोन्ही येथे वाघांचा मुक्त संचार सुरू असल्याचे माहीत असतांनाही वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी यांचे दुर्लक्षामुळे दिनांक १४/७/२०२० ला लोनवाही हद्दीतील सहकारी राईसमिलचे आवारातील जंगलसदृष भागात पट्टेदार वाघाने दडी मारल्यामुळे राईसमिल कामगारावर गंभीर जखमी होन्याची वेळ आली. याला जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकारी व राईसमिल व्यवस्थापन नक्किच आहेत. कारण शेतकऱ्यांचे धानभरडाईपासून निघणारा कोंद, ज्यापासून व्यवस्थापनाला लाखो रुपये उत्पन्न मिळते. परंतु स्वत:चे आवाराची देखभाल करण्यासाठी त्यांना वेळ नाही. आवार जर स्वच्छ असते, तर वाघीणीला दडी मारता आली नसती व नाहक कामगारावर गंभीर जखमी होन्याची वेळ आली नसती. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी ‌जंगलाची चोरी वा वन्यप्रान्यांचे शिकारीबाबत नागरिकांवर कडक कारवाई करतात. मग अधिकारी, कर्मचारी यांचेवर जंगलाचे संरक्षणाची जबाबदारी असतांना कितपत वनाचे संरक्षण होते ? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये कारवाई करण्याचा अधिकार असला तरी मनुष्य जिवाचे संरक्षणाची जबाबदारी झटकून चालणार नाही. सामान्य माणसाची जिवीतहानी झाल्यास त्याचे कुटुंबाचे कधी न भरून निघणारे आपरिमीत नुकसान होते. त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्र्न सहजपणे उपस्थित केला जातो. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील लोनवाहीचे हद्दीत असलेल्या सहकारी राईसमिल चा आवारातील जंगलसदृष भागात सकळी ७-३० ला (मादि) पट्टेदार वाघाने राईस मिल चा कर्मचारी गजानन मुरलीधर ठाकरे वय 46 वर्ष रा. लोनवाई  याच्यावर हमला करून गंभीर जखमी केले, आणि आणि आवारातील झुडपांमध्ये दडी मारून बसल्याच्या माहितीनुसार

वनविभाग ब्रम्हपूरी च्या अधिकारी कु. रामेश्वरी बोंगाळे, सहाय्यक वनसंरक्षक यांचे निर्देशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी तसेच सिंदेवाही पोलिस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाघापासून बचावासाठी राईमिलचा कांही परिसर जाळे लाऊन लॉकडाऊन केला होता. दिवसभराचे तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी सायंकाळी ६-४६ वाजता आवश्यक सुर्यप्रकाशात सदर पट्टेदार वाघ (मादी) याला जेरबंद करण्यात यश आले. याकामी पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे यांचे मार्गदर्शनात RRT-TATR चे चमुने यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर सदर वाघीणीस निसर्गमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा कुठे परिसरातील जनतेनी सुटकेचा निःश्वास टाकला. सदर कार्यवाहीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण गोंड आणि कर्मचारी यांचे सोबत सकाळी ७-३० ते सायंकाळी ६-४५ पर्यंत पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके, उप.पो.निरीक्षक गोपीचंद नेरकर आणि पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेऊन मोलाचे सहकार्य केले.

Previous articleराज्यातील ग्रामीण पञकारांना प्रशासक म्हणून संधी उपलब्ध करून द्यावी – “पञकार संरक्षण समिती” ग्राम-पंचायतीवर महाविकास आघाडीच्या समन्वयातून प्रशासकासोबतच ग्रामीण पञकारांचाही विचार व्हावा – विनोद पञे
Next articleअहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी पक्ष संघटनेकरिता कसली कंबर. सदस्य नोंदणी अभियानाला आला वेग.