रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे लॉकडाऊन संपले आजपासून दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत मिशन ब्रेक द चेन म्हणत कडक लॉकडाउन जाहीर केले होते. मात्र काल रात्री बारा वाजता या लॉकडाऊनची मुदत संपली. आजपासून जिल्हा प्रशासनाचे लॉकडाऊन नसेल. त्यामुळे दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. मात्र खबरदारीच्या उपाययोजना करून व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. लॉक डाऊन बाबत शिथिलता मिळावी अशी मागणी अनेकांनी केली होती मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

दखल न्यूज भारत