युरियाच्या साठेबाजांवर कारवाई करून शेतकरयांना युरिया उपलब्ध करून द्या. युवक काँग्रेस प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांची जिल्हा कृषी अधीक्षकांकडे मागणी.

125

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

सध्या जिल्हाभरात खरिपाची पिके जोरात आहेत. अशावेळी पिकांना युरीयाची नितांत गरज आहे .परंतु सुरुवातीपासूनच जिल्ह्यामध्ये खतविक्रेत्यांनी युरियाची साठेबाजी सुरू केल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. युरियाच्या या साठेबाजांवर कारवाई करून शेतकऱयांना युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरयांना युरिया किंवा कुठलेही खत कमी पडणार नाही. पुरेशा खतांचे नियोजन केलेले आहे. अशे वारंवार राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलेले आहे जिल्हय़ामध्ये सुद्धा पुरेसे खत उपलब्ध असल्याचे वारंवार जिल्हा अधीक्षक अधीकारी सांगतात परंतु जिल्हाभरात युरिया खताच्या बाबतीत खतविक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात साठेबाजी व लिंकिंग म्हणजे युरिया लागत असेल तर अनावश्यक व जास्त किमतीची खाते घ्यावीच लागतील अशा पद्धतीचा आग्रह धरून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. अशी तक्रार सुद्धा कपिल ढोके ह्यांनी केली.
शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा व साठेबाजी करणाऱ्या खत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी केली आहे. ह्यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी विजयराव देशमुख उपस्थित होते.

प्रतिक्रीया:

राज्यभरात रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही. अशी हमी राज्यातील शेतकऱयांना कृषी मंत्री मा. दादाजी भुसे यांनी वारंवार दिली आहे. तरी सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये खतांची व युरियाची मोठय़ा प्रमाणात साठेबाजी व लिंकिंग सुरू आहे. शेतकऱयांना युरिया उपलब्ध होत नाही.
यासाठी साठेबाजांवर कारवाई करा व शेतकऱयांना युरिया उपलब्ध करून द्या. अशी मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे केली दोन दिवसांत सर्व खत विक्रेत्यांना रीतसर नोटीस देऊन दुकाने तपासून युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाईल अशी ग्वाही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ह्यांनी दिली.
येत्या तीन दिवसांत युरियाचे वितरण सुरळीत प्रमाणे होईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल .

– कपिल ढोके
प्रवक्ता महाराष्ट्र
प्रदेश युवक कॉंग्रेस.