विकासासाठी दळणवळणाची अधिक गरज आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन देवलमरी नाल्यावरील पुलाचे उदघाटन अठरा गांवे अखंडितपणे जोडून राहणार!

136

 

प्रतिनिधी / रमेश बामनकर, रोजा गाडपेली
गुड्डीगुडम:- विकासासाठी रस्ते व दळणवळणाची अधिक गरज असून त्यासाठी रस्ते व नाल्यांवरील लहान-मोठे पुल उभारण्यात यावे यासाठी कटाक्षाणे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते बुधवार 15 जुलै रोजी अहेरी तालुक्यातील देवलमरी येथील नाल्यावरील मोठ्या पुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात उदघाटनीय स्थाना वरून ते बोलत होते.
कार्यक्रमात यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, देवलमरी येथील ज्येष्ठ नेते मुतन्ना दोन्तुलवार, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम, उपविभागीय अभियंता राजकुमार नाकले, कंत्राटदार व्हि.बी.बोम्मावार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे उदघाटनीय स्थानावरुन बोलतांना आ.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, “गांव तिथे रस्ता व गांव तिथे बस सेवा” हे आपले आधिपासुनचे ब्रीद वाक्य असून अहेरी क्षेत्रातील प्रत्येक नाल्यांवरील पुलाकरीता व रस्ते कामांकरीता सदैव प्रयत्नशील असून त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे मोठ्या आत्मविश्वासाने बोलून दाखविले.
ततपुर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी विधिवत पूजन केले. त्या नंतर आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी पुलावरील नाम फलकाचे अनावरण आणि फीत कापून उदघाटन केले.
तब्बल 25 वर्षानंतर देवलमरी येथील नाल्यावर पुलाची निर्मिति करण्यात आले असून सदर पुलामुळे जवळपास 18 गावांचा संपर्क पावसाळ्यातही तालुका मुख्यालयाशी जोडून राहणार आहे. सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा पर्यंत सदर पुलावरून ये-जा करता येणार असून त्यामुळे आता त्या भागातील गावकऱ्यांची रस्ता व पुलाची समस्या सुटली व नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे.
यावेळी रा.काँ.चे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, श्रीकांत मद्दीवार, लक्ष्मण येरावार, महेश अलोने, शैलेश पटवर्धन, इरफान शेख, श्रीनिवास मगडीवार, संतोष तोरे आदी आणि गावकरी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.