घरडा कंपनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ कंपनी कोरोना हॉटस्पॉट?

.

खेड:काल रत्नगिरी जिल्ह्यात ३३५ स्वाबची तपासणी केली गेली, त्यात ८९ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या घरडा कंपनीचे २० रुग्ण सापडले कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. आतापर्यंत घरडा कंपनीमध्ये एकूण ६३जण कोविड बाधित निघाले आहेत. या कंपनीने आपल्या काही कर्मचारी वर्गाचे स्वाब पुण्याला तपासायला पाठवल्याची चर्चा आहे. रत्नागिरी येथील सिव्हिलमध्ये जेवढे स्वाब पाठवले जातात तेवढे आपल्या कोविड सेंटरमधून तपासले जात आहेत. तर काही कोरोनाबाधित लोक कळंबणी येथे दाखल आहेत. पुण्यात पाठवलेल्या स्वाबमध्ये किती अजून किती पॉझिटिव्ह रुग्ण येतात, याकडे लक्ष आहे. लोटे येथील घरडा कंपनी कोरोना हॉटस्पॉट बनली असून ही कंपनी तात्काळ बंद करावी, अशी मागणी शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी केली होती. तर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीदेखील शहरातील मजुरांना एमआयडीसी भागात जाण्यास मज्जाव केला होता व कंपनीने कारवाई केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी यावर आवाज उठविला होता. ज्यावेळी या घरडा कंपनीत प्रथम कोरोना बाधीत सापडला त्याच वेळेला जर ही कंपनी बंद केली असती तर घरडा कंपनी हॉटस्पॉट ठरली नसती असे देखील बोलले जात आहे तर कंपनी प्रशासनाने नियमांचे पालन केले होते की नाही एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळत असतील तर कंपनी तेव्हाच बंद का करण्यात आली नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

*दखल न्यूज भारत*