प्रतिनिधी / निलेश आखाडे.
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये राज्यात प्रथमच सामान्य जनतेच्या बाजूने जिल्हाप्रशासनाच्या मनमानी लॉकडाऊन विरोधी “आत्मक्लेश ” सत्याग्रह जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्यात आला.’कोविड१९’ च्या संकटात सामान्य जनता,छोटे व्यावसायिक,व्यापारी वर्ग,रिक्षावाले,बेरोजगार, आर्थिक संकटात पडले असताना जिल्हा प्रशासनाचा हा मनमानी कारभार कशासाठी ? लॉक डाऊन विरोधी जिल्हाकाँग्रेस पूर्णपणे नसून समजातिल सर्व घटकांना समवेत घेऊन निर्णय का घेतला जात नाही ? असे प्रश्न सामान्य जनतेच्या वतीने रत्नागिरी जिल्हाकाँग्रेसचे अध्यक्ष अॅड विजयराव भोसले यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केले.तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून,घोषणा देवून व आम्ही संविधान चे रक्षण करू अशी शपथ घेऊन राजगृहावरील भ्याड हल्याचा निषेध व्यक्त केला. तदप्रसंगी जिल्हाअध्यक्ष अॅड विजयराव भोसले,जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव,जिल्हा उपाध्यक्ष रमेश शहा, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब मयेकर,जिल्हा सरचिटणीस बंडू शेठ सावंत,जिल्हा सरचिटणीस राजेश पत्याने, संगमेश्वर तालुका अध्यक्ष दत्ता परकर, महिला राष्ट्रीय सेवा दलाच्या भुस्कुटे मॅडम ,अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष हरिष शेकासांन , युवक काँग्रस प्रदेशचिटणीस शिल्पा कांबळे,ज्येष्ठ नेते दीपक राऊत,कपिल नागवेकर,सचिन मालवणकर,गजानन पिलंकर ,अब्बास आंबेडकर, कैसं मालगुंडकर,गौतम मॅडम इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
*दखल न्यूज भारत*