कोकणातील गणेश मूर्तिकारांचे होत आहे मोठे नुकसान

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- कोकणातील गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा मोठा उत्सव चाकरमानी गावाकडे येऊन अगदी आनंदात आरती, भजन, मिरवणुका यामध्ये दंग झालेले पाहायला मिळतात. यावर्षी मात्र गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट असणार आहे. त्यामुळे शासनाने देखील कडक निर्बंध घातले आहेत याच पार्श्वभूमीवर कोकणातील गणेश मूर्तिकारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील शाडूच्या मातीपासून बनवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात, विदेशातही जातात त्याची मोठी मागणी असते, मात्र यावर्षी कोरोनामुळे शासनाने गणेशमूर्तींच्या उंची ठरवून देण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेच. तसेच श्रीगणेशाच्या मूर्तीही 4 फुटापर्यंत असावी. गणेशोत्सवाच्या काळात कुणीही कुठेही गर्दी करु नये. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच! ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहेच! असे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. घरगुती गणेश मूर्ती व सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटापेक्षा जास्त असणार नाहीत असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिणामी गणेश मूर्तिकारांनी वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेल्या गणेशमूर्तींचे करायचे तरी काय असा प्रश्न त्यांना पडला आहे अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती तयार आहेत मात्र या गणेश मुर्ती ती आता गणेश कारखान्यात तशाच राहणार आहेत त्यामुळे गणेश मूर्तिकारांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने अशा गणेश मूर्तिकारांना आर्थिक मदत करावी अशीही मागणी होताना दिसत आहे.

*दखल न्यूज भारत*