गळफास घेऊन युवका चीआत्महत्या

179

 

कमलासिहं यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

पाराशिवनी :-(तालुका वार्ताहर) पारशिवनी
तालुक्यातील दहेगाव (जोशी) येथील रहिवाशी प्रशांत कृष्णाजी बोंदरे (२८ ) याने १३ जुलै रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत हा एनटीपीसी मौदा येथे काम करायचा. मात्र, कोरोनामुळे तो दोन-तीन महिन्यांपासून कंपनीत कामाला गेला नाही. त्यामुळे तो तणावात असल्याचे कळते. १३ जुलै रोजी सायंकाळी नाश्ता करून तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला व गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर खोलीत पाहिले असता तो दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही माहिती पारशिवनी पोलिस ठाण्यात दिली असता पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांना सोपवून त्याच्यावर स्थानिक कन्हान नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यापश्‍चात पत्नी, एक मुलगी, आई -वडील, दोन बंधू असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.