ग्रा पं. वर प्रशासक बनायचे का? ११हजार रुपये राष्ट्रवादीच्या खात्यात पैसे जमा करा आणि प्रशासक बना, राष्ट्रवादी कांग्रेस चा प्रशासक नियुक्ति चा मोठा घोटाळा उघडकीस

2730

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

पुणे १५ जुलै २०२०
सध्या महाविकास आघाडी सरकार कोण चालवते हा प्रश्न जनतेला पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेच महाविकास आघाडी चे सरकार चालवतात हेच आतापर्यंत दिसुन आले आहे. आता तर राष्ट्रवादी काँग्रेस ने नवीन आँफर आणली आहे. ग्रा पं. वर प्रशासक बसविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात ११हजार रुपये भरा आणि प्रशासक बना.

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांना असे टार्गेट दिले आहे की प्रत्येक गावातुन शेकडो कार्यंकर्त्याकडुन करोड़ों रुपये पार्टी फंड म्हणुन जमा करण्याची परवानगी दिली आहे. काय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना याबद्दल कल्पना आहे का? काय राष्ट्रवादी कांग्रेस ला अशा पद्धतीने प्रशासक नियुक्तीला शासनाने परवानगी दिली आहे काय? काय राष्ट्रवादी कांग्रेस पक्षासारखे शिवसेना किंवा कांग्रेस ने पण असेच आपापल्या जिल्हा अध्यक्षांना पक्षनिधी उभा करण्यासाठी उद्योग सुरू केलेत काय? या मोठय़ा घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने कुठल्याही ग्रा पं. वर भ्रष्ट, अडाणी, अशिक्षित धनदांडगे व्यक्ती प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यास भ्रष्टाचार होणार नाही का?
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी सर्व तालुका अध्यक्षांना पत्र लिहून कळविले आहे की? पुणे जिल्ह्य़ातील ७५० ग्रा पं. ची मुदत ३१ डिसेंबर २०१९ ते १ जुलै २०२० ला संपली आहे. त्या ग्रा पं. वर प्रशासक नेमला जाणार आहे. जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना एक प्रशासक नेमण्याचा अधिकार आहे. त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व तालुका अध्यक्षांनी आपापल्या गावची यादी घेऊन प्रशासकाची नावे २० जुलै २०२० पर्यंत पाठवावी तसेच इच्छुक उमेदवारांनी ११हजार रुपये विनापरतावा राष्ट्रवादी कांग्रेस च्या अकाऊंट मध्ये जमा करावे असे आपल्या स्वाक्षरीनिशी पुणे जिल्हाध्यक्ष प्रविण गारटकर यांनी पत्र काढले आहे.
या अशा पत्रामुळे बोगस व भ्रष्ट लोकांचा ग्रा पं मध्ये प्रवेश होऊन प्रशासक या नात्याने ग्राम पंचायत लुटली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वेळीच असे भ्रष्ट प्रयत्न हाणून पाडावे व अतितात्काळ ग्रा पं. निवडणुका घेण्याचे नियोजन करावे जेणेकरून ग्राम पंचायत ची अर्थव्यवस्था खिळखिळी होणार नाही.