नीरा नरसिंहपुर दिनांक 15 प्रतिनिधी बाळासाहेब
गाव पातळीवर होत असणारे विकासकार्य हे त्या गावासह तालुका पर्यायाने राज्य व राष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारे असते. व या कार्यात सातत्य राहावे यासाठीच मी सदैव कटिबद्ध असतो
आज आपल्या इंदापूर तालुक्यातील रूई या गावांतून पार पडलेल्या विविध विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती, तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी हे मत व्यक्त केले.
आज इंदापूर तालुक्यातील रुई गावच्या, सर्वांगीण विकासासाठी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नव्याने उभारलेल्या पशू वैद्यकीय दवाखाना इमारतीचा लोकार्पण सोहळा, तसेच ग्रामपंचायत कार्यालय उदघाटन समारंभ प्रविण माने यांच्याहस्ते पार पडला.
आज उदघाटन झालेल्या या पशू वैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी जिल्हा परिषद निधीतून ४५ लाख रुपये तर ग्रामपंचायत कार्यालयासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी इंदापूर पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे ,पळसदेव ग्रा प सदस्य मेघराज कुचेकर, व सरपंच रुपाली आकाश कांबळे, उपसरपंच कविता दीपक साळुंखे, अजित पाटील, विष्णू मारकड, यशवंत कचरे, काका पांढरमिसे, अंकुश लावंड, मोहन लावंड, सर्जेराव मारकड, अर्जुन पाटील, आकाश कांबळे, दीपक साळुंखे, बबन मारकड, अमर मारकड, प्रविण डोंबाळे, ग्रामसेवक सुनील पवार,पांडुरंग डोंबाळें, रोहिदास कांबळे, देवा लावंड, तसेच ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.
Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160