सीबीएसई दहावीच्या परिक्षेत तन्वी नितीन वाघ चे कौतुकास्पद यश संपादन

563

अतुल पवळे पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
आज दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे खडकवासला मतदारसंघांचे प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य नितीन अण्णा वाघ यांच्या लहान कन्या तन्वी वाघ यांनी देखील ही परिक्षा दिली होती. व निकालही ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला, यामध्ये तन्वीने कौतुकास्पद यश संपादन केले आहे. तिने 91 टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याने घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तिने शैक्षणिक जीवनात असेच उत्तरोत्तर यश संपादन करत रहावे ह्या शुभेच्छा देण्यात आल्या.