Home Breaking News नागपुर जिल्हा परिषद वर कोरोना चे संकट; जि. प. अध्यक्षांचे पती...

नागपुर जिल्हा परिषद वर कोरोना चे संकट; जि. प. अध्यक्षांचे पती पाँजिटीव आढळले!; जि. प. चा कारभार अध्यक्षांचे पती सांभाळतात अशी चर्चा

403

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत टीम
नागपुर

नागपुर : १५ जुलै २०२०
आज नागपूर जिल्हा परिषद च्या अध्यक्षांच्या पतीची कोरोना टेस्ट पाँजिटीव आल्याने संपूर्ण नागपुर जिल्हा परिषद मध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण अशी चर्चा आहे की नागपुर जिल्हा परिषद चा कारभार अध्यक्षांचे पतीच सांभाळतात.अशी काही जनप्रतिनिधी यांनी खाजगीत बोलताना सांगितले.
विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत तसेच ठेकेदार यांचे सोबत ते मिटिंग घेत असल्याचे बोलले जाते. मध्यंतरी एक व्यक्ती होम कोरोंटाईन असतांनाही अध्यक्षा उपाध्यक्ष यांचे केबिन मध्ये बसले होते पण ते गेल्यानंतर या केबिन ला सेनिट्राईज केले होते.जि.प.अध्यक्षांनी एका चैनल वर मुलाखतीत सांगितले की त्यांचे पतीला कोणतेही लक्षण नव्हती पण त्यांनी सामाजिक कार्य म्हणून पुढे येऊन स्वतःची टेस्ट सोमवारी केली तिचा रिपोर्ट आज सकाळी पाँजिटीव आल्याने सध्या नागपुर जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार तसेच जनप्रतिनिधी यांच्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपापली टेस्ट करुन घ्यावी असे अध्यक्षांनी आवाहन केले आहे. परंतु एवढे मात्र नक्की की सध्या नागपुर जिल्हा परिषदेवर कोरोना चे संकट उभे ठाकले असुन जिल्हा परिषदेत ही कोरोना चा शिरकाव होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपुर जिल्हा परिषद चा परिसर सेनिट्राईज केला जातो का किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या टेस्ट होतात काय यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleमारेगाव तालुक्यात जोरदार पाऊस कुंभा परिसरात ढगफुटी अती पावसाने बैलाच मृत्यू शेतातिल पीकात पाणी साचून मोठे नुकसान अचानक आलेल्या जोरदार पावसाने शेती अवजारे गेली वाहुन  सिंचनाचे साहित्यही गेले वाहुन नरसाळा येथील दोघे जण वाहून गेले परंतु सुदैवाने बचावले
Next article“दखल न्युज”चा दनका, अखेर ‘त्या’ आदिवासी जमातीच्या महिलेला मारहान करुन विनयभंग करण्यार्या आरोपीवर गुन्हे दाखल, अ.भा.म. सं.ह.प.च्या राज्याध्यक्षा सौ.मनिषा तिराणकर यांनी केली होती मागणी