Home Breaking News मारेगाव तालुक्यात जोरदार पाऊस कुंभा परिसरात ढगफुटी अती पावसाने बैलाच मृत्यू...

मारेगाव तालुक्यात जोरदार पाऊस कुंभा परिसरात ढगफुटी अती पावसाने बैलाच मृत्यू शेतातिल पीकात पाणी साचून मोठे नुकसान अचानक आलेल्या जोरदार पावसाने शेती अवजारे गेली वाहुन  सिंचनाचे साहित्यही गेले वाहुन नरसाळा येथील दोघे जण वाहून गेले परंतु सुदैवाने बचावले

1152

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव:
तालुक्यात काल पासून तुरळक पडणारया पावसाने आज बुधवारी सकाळी अकरा वाजता कुंभा परिसरात ढग फुटीने जोरदार पावसाचा वर्षाव झाला. या मध्ये शेती साहीत्यासह सिंचन साहित्य वाहुन गेले तर टाकळी येथे बैल मृतूमुखी पडला
तालुक्यातील मार्डी, बोरी, टाकळी, कुंभा, सिंधी,नरसाळा, कोथुर्ला, खैरगाव, दापोरा, व बहुतांश भागात सलग दिवसभर पाऊस कायम असल्याने शेतातुन मोठया प्रमाणात पाणी निघाले. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात साचल्याने व पीक वाहून गेल्याने शेतकरी हादरले.
कुंभा परिसरातील टाकळी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अती पावसामुळे शेतामध्ये फुटाचे खड्डे पडले यामध्ये शेतातील पाईप,इंजिन, स्पिंकलर, कपासी, सोयाबीन, यासह मक्का पिकांचे मोठे नुकसान झाले.
तालुक्यात या वर्षीचा सर्वात मोठा पाऊस असून तालुक्यात विविध ठिकाणी पुराणे थैमान घातले होते. तर टाकळी (कुंभा) येथील विटाबाई शंकर गेडाम या शेतकरी महिलेच्या बैलाचा मृत्यू झाल्याने शेती हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने त्या महिलेचे मोठे नुकसान झाले आहे आता शेती हंगामात बैलासाठी वणवण हिंडन्याची वेळ या महिलेवर आली आहे. तर या महिलेचे तीस पाईप सह इंजिन व साहित्य कपासी सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले तिला शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

Previous articleउदयाला 12 विच्या परीक्षेचा निकाल
Next articleनागपुर जिल्हा परिषद वर कोरोना चे संकट; जि. प. अध्यक्षांचे पती पाँजिटीव आढळले!; जि. प. चा कारभार अध्यक्षांचे पती सांभाळतात अशी चर्चा