पोलिस विभागातर्फे नगरपंचायत क्रीागंनावर वृक्षारोपण . वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे- अतुल कुलकर्णी

0
98

 

उपजिल्हा प्रतिनिधी रुपेश कुमार टेंभुर्णिकर दखल न्युज गोंदिया

देवरी:-
दि.२६ : आज वृक्षलागवड काळाची गरज झाली आहे. वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम आज दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे.ऐकीकडे कोरोनाची महामारी तर दुसरीकडे व्रुक्षांची घटती संख्यां यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन गोंदीया जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
…………………………………….
आज २६ सप्टेबंर रोजी देवरी शहरातील नरपंचायतच्या क्रीडागंनावर पोलिसविभागाच्या वतीने वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत ७० झांडाचे वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक कुलकर्णी बोलत होते. यावेळी पोलिस विभातील देवरी पोलिस्टेसनचे थानेदार अजित कदम, पी.आय.देसुरकर , सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव व पोलिस कर्मचार्यांची प्रमुख उपस्थिती होती.

अतुल कुलकर्णी म्हणाले, वृक्ष लागवड मोहिमेत लोकांचा सहभाग असणे अत्यंत महत्वाचे आहे. शहरवासीयानीं प्रत्येक वृक्षाची कुटूंबातील परिवातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. जागतिक तापमानवाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे. भविष्यात भीषण दुष्काळाला सामना करण्याची वेळ येवू नये यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे.