उदयाला 12 विच्या परीक्षेचा निकाल

0
245

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

महाराष्ट्र
फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. याची घोषणा राज्य उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 16 जुलै 2020 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर हा निकाल विद्यार्थी-पालकांना पाहता येईल. याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे.
याबाबत नुकतीचं अधिकृत माहिती आता देण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे.

या लिंकवर निकाल पाहता येईल…

www.maharesult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरु होत (Maharashtra Board HSC Exam) आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. (HSC Result 2020 Maharashtra Board)

बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 05 हजार 027 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी आहेत. या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतील 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेतून 4 लाख 75 हजार 134 विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 373 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 9 हजार 923 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 036 परीक्षा केंद्र आहेत