मुक्तीपथ अभियानाच्या वतीने मोसम येथे व्यसन उपचार शिक्षण शिबीर संपन्न…. 10 व्यसणीने घेतले उपचार…

187

 

प्रतिनिधी / रमेश बामनकर

गुड्डीगुडम: अहेरी तालुक्यातील मौजा मोसम येथे दि.15 जुलै रोजी मुक्तीपथ तालुका कार्यालय अहेरी व मुक्तीपथ गाव संघटना मोसम च्या संयुक्तपणे एक दिवसीय व्यसन उपचार शिक्षण क्लिनिक कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा मोसम येथे आयोजित केले होते.
सदर व्यसन उपचार शिक्षण क्लिनिक शिबिर घेण्यासाठी श्री श्रीनिवास राऊत तंटामुक्त समिती सदस्य,श्री जगनाथ मडावी माजी उपसरपंच, श्री अनिल येलमुले एकल विद्यालय आचार्य यांनी सहकार्य केले.या शिबिरात मोसम येथील दहारुग्णांनी उपचार घेतले.
या वेळी श्री केशव चव्हाण तालुका संघटक, श्री मारोती कोलावार तालुका प्रेरक अहेरी/भामरागड, श्री साईनाथ मोहूर्ले समुपदेशक, कु.पूजा येलूरकर संयोजिका उपस्थित होते.