रत्नागिरी जिल्ह्यात आज एकाच दिवशी सापडले ८९ पॉझिटिव्ह

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

रत्नागिरी : आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी अधिक वाढली आहे तर लोकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे बनले आहे. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०४९ झाली आहे. दरम्यान २१ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५५ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये घरडा येथून १, जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून ४, कोव्हीड केअर सेंटर, पेढांबे येथून १३आणि ३ समाजकल्याण रत्नागिरीमधील आहेत.
आज मिळालेल्या पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी १३, कळबणी १७, घरडा, खेड २०, संगमेश्वर ३, कामथे १९, गुहागर १०, दापोली ७ तर दापोली येथील ६२वर्षीय महिला कोरोना रुग्णांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता ३४ झाली आहे. तर आज सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
▪️एकूण पॉझिटिव्ह -१०४९
▪️बरे झालेले-६५५
▪️मृत्यू -३४
▪️एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह -३६०

दखल न्यूज भारत