धक्कादायक बातमी.नागभिड तालुक्यात होते गायींची कत्तल आणि गोमांस विक्री. सिंदेवाही तालुक्यातील गावांमध्ये अनेक वर्षांपासून गोमांस विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती.

274

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी
दखल न्युज व दखल न्युज भारत.

चंद्रपूर जिल्ह्यातील आणि नागभीड तालुक्यातील फकीर लोकांची बहुसंख्य वस्ती असलेले फकीरबहूल गांव “नांदेड”या गांवात अनेक वर्षांपासून गाय, बैलांची कत्तल केली जाते. व त्याचे मांस लगतचे सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचाच प्रत्यय दिनांक- १२/७/२०२० चे सकाळी ६-३० ते ७-०० वाजता दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील पळसगांव (जाट) या गांवात आला. नांदेड येथील अजीम नजीर शेख हा २३ वर्षे वयाचा तरूण बिना नंबरच्या होंडा शाईन या दुचाकीवरून १० किलो गोमांस पिशवीत भरून, पळसगांव (जाट) येथे आवाज देऊन विकत असल्याचे तेथील पोलीस पाटील श्री. कोलते आणि श्री. राहुल योगेश्वरदास अलमस्त
यांचे निदर्शनास आले असतांना, तेथील कांही जागरूक नागरिकांचे सहकार्याने सदर तरूणाला गोमांस विकन्यास मज्जाव करत त्याला पकडून ठेवले. आणि त्याबाबत सिंदेवाही पोलिस स्टेशन ला भ्रमणध्वनीवर सुचना दिल्यावरून लगेचच पोलिस उपनिरीक्षक श्री. गोपीचंद नेरकर सहकाऱ्यांना सोबत घेऊन, पळसगांव (जाट) गांव गाठून, सदर गोमांस विक्री करणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले. व सिंदेवाही पोलिस स्टेशन ला हजर केले. कांही वेळाने गुरांचे डॉक्टरांना पाचारण करून, त्यांचेसमवेत गोमांस विक्रेत्याला पोलीस गाडीने मांसाचा पंचनामा करून, मांस नाश करण्यासाठी घेऊन गेले. बातमी लिहीपर्यन्त‌ पुढील कार्यवाही व्हायची होती.