भंडारा जिल्ह्यात आज 3 डिस्चार्ज 6 पॉझिटिव्ह; क्रियाशील रुग्ण 93;एकूण मृत्यू 02

129

 

प्रतिनिधी/बिंबिसार शहारे

भंडारा दि.15/07/2020:
जिल्ह्यात आज 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 6 व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 90 आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 03, पवनी तालुक्यातील 02 व मोहाडी तालुक्यातील एक व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 90 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 185 झाली असून 93 क्रियाशील रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 02 आहे.

भंडारा येथील रुग्णांमध्ये 30 वर्षीय स्त्री (संशयित), 33 वर्षीय पुरुष भंडारा व 60 वर्षीय पुरुष (संशयित) यांचा समावेश आहे. पवनी येथील रुग्णांमध्ये 18 वर्षीय पुरुष पुण्यावरून तर 31 वर्षीय स्त्री अहमदाबाद येथून पवनी आलेली होती. मोहाडी येथील पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही नागपूरवरून आली होती.