Home Breaking News पशुवैद्यकीय दवाखाना कोरेगांव (श्रेणी-१) अंतर्गत नरचुली येथे गुरांना “एकटांग्या” रोगनियंत्रक लसीचे लसीकरण…

पशुवैद्यकीय दवाखाना कोरेगांव (श्रेणी-१) अंतर्गत नरचुली येथे गुरांना “एकटांग्या” रोगनियंत्रक लसीचे लसीकरण…

182

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

आरमोरी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर दुर्गम भागात वसलेल्या मौजा नरचुली येथे सलग दोन दिवस पशुवैद्यकीय दवाखाना कोरेगांव रांगी (श्रेणी-१) अंतर्गत गावातील गुरांना एकटांग्या रोगांची लागण होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन एकटांग्या रोगनियंत्रक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. सोबतच शेळ्यांना ‘आंत्रविषार’ ही लस देण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखाना कोरेगांव (श्रेणी १) मधे परीसरातील कोरेगाव, परसवाडी, सलंगटोला, नरचुली, येगांडा, थोटेबोडी, कुरंडी, नरोटीचक, विहीरगाव, कुकडी, वानरचुवा, नरोटीमाल, पिपरटोला, मोहटोला, अशा प्रकारे १८ ते २० गावांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक गावात दोन ते तिन दिवस सदर एकटांग्या रोगप्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जोमाने सुरु असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती कुलकर्णी मॅडम यांनी दीली. लसीकरण करण्यात आले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुलकर्णी मॅडम स्वतः हजर होत्या. तर त्यांचे सोबत पशुधन पर्यवेक्षक टि. एम. तुमरेटी प्रामुख्याने हजर होते.

Previous articleघाटकोपर मध्ये अज्ञात चोरांनी दुकाने फोडली
Next articleजीवन गौरव मासिक’ अॉनलाईन काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर