बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी चुनाभट्टी येथील गुलमोहर मार्ग वसंत वैभव सोसायटी समोर धोकादायक झाड मुळासकट रोडवर कोसळले असताना या घटनेची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांना मिळताच तात्काळ त्यांनी एल विभाग वृक्ष अधिकारी यांना फोन करून रस्त्यावरील पडलेले झाड हटविण्याचे सांगितले या दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांनी झाडाची छाटणी करून रस्ता स्वच्छ करत मोकळा केला .रस्त्यावर पडलेले झाडं त्वरित काढण्याचे काम नगरसेवक कप्तान मलिक यांच्या सहकार्याने करण्यात आले दरम्यान घटनास्थळी चुनाभट्टी पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते
Home महाराष्ट्र चुनाभट्टी मध्ये रस्त्यावर झाड कोसळले मनपा कर्मचाऱ्यांनी झाड छाटणी करून मार्ग केला...