शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्रं.०८ च्या पदाधिकारी यांची वतीने अदानी वीज कंपनीचे अतिरिक्त उपाध्यक्ष श्री.जयपाल वडगावे यांच्याबरोबर चर्चा वीज कंपन्यांची मुजोरी खपवुन घेणार नाही.भरमसाठ वीज देयकामुळे नागरिक त्रस्त

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेले ३ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे कोणत्याही प्रकारचे उत्पनाचे साधन नसल्यामुळे नागरिक हतबल आहेत. त्यातच नागरिकांना आलेल्या भरमसाठ वीज देयकामुळे नागरिक त्रस्त आहेत. या अनुषंगाने नागरिकांना सध्या आलेल्या विजेचे देयक कमी करून त्यात सवलत देण्यात यावी याकरिता आज शिवसेना विभागप्रमुख श्री.राजेंद्र राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली अदानी वीज कंपनीचे अतिरिक्त उपाध्यक्ष श्री.जयपाल वडगावे व इतर अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून वीज देयक कमी करून सवलत देण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेवक,प्रभाग समिती अध्यक्ष श्री.परमेश्वर कदम साहेब,नगरसेवक श्री.तुकाराम (सुरेश) पाटील साहेब,नगरसेविका सौ.समीक्षाताई सक्रे,उपविभागप्रमुख श्री.चंद्रपाल चंदेलिया साहेब ,श्री.विजय पडवळ साहेब,श्री.विलास पवार साहेब,श्री.तात्या सारंग साहेब तसेच शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते. जोपर्यंत वीज कंपनीचे अधिकारी येऊन तुमच्या मिटरचे रिडींग घेऊन बिल पाठवत नाहीत तोपर्यंत बिल भरायचे नाही.जर कुणी अधिकारी कारवाईसाठी आले तर त्वरित आमच्याशी संपर्क साधा !