शेतातील सरकारी नालीवर बांध व दगड टाकल्याने शेतकऱ्याचे नुकसान,देव्हाळा येथिल शेतकऱ्याची तहसिलदाराकडे तक्रार

यवतमाळ/ परशुराम पोटे

मारेगाव तालुक्यातील देव्हाळा येथिल शेतकरी बाळू परमदास फुलझले यांच्या मालकीचे शेत सर्वे न.४२ लगत सरकारी नाली द्वारे दोन शेता मधून सरळ पाणी वाहून जात होते. मात्र गैरअर्जदार शेतकरी बाळकृष्ण तुरारे व किशोर बाळकृष्ण तूरारे यांनी स्वतःच्या हिता पोटी
सदर शेतातील नालीवर बांध व दगड टाकून फुलझेले यांच्या मालकीच्या शेतात पाणी वळते केले यात पावसाचे पाणी सरळ वाहून न जाता पिकात जात असल्याने पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत फुलझेले यांनी मारेगाव तहसीलदारांकडे लेखी तक्रार करून होणाऱ्या पिक नुकसानीची हानी टाळावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदार बाळु परमदास फुलझेले यांचे शेत सर्वे नंबर 42 असुन गैरअर्जदार बाळक्रुष्ण तुरारे व किशोर बाळक्रुष्ण तुरारे हे पोट हिस्सेदार आहेत. या पोटहिस्सेदारांनी सरकारी नालीत बांध व दगड टाकुन अर्जदाराचे शेतात पाणी वळविले आहे.परिणामी अर्जदाराच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे तहसीलदारांनी प्रत्यक्षात मोका पाहणी करून तातडीची कारवाई करावी व तक्रारदार शेतकऱ्याला न्याय मिळवुन द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.