शिक्षण विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा…. आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी आविसं कडून जि. प.अध्यक्ष कंकडालवार व जि.प.उपाध्यक्ष पोरेटी यांना निवेदन सादर

185

 

सिरोंचा…सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात रिक्त असलेल्या सर्व पदे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी भरण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचा कडून जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेचे अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी हे सिरोंचा दौऱ्यावर आले असता आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगम व सल्लागार रवी सल्लम यांनी शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा करून त्याना निवेदन सादर केले.

आविस कडून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सिरोंचा येथील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी , अधीक्षक शा.पो.आ.विस्तार अधिकारी श्रेणी 2 चे चार पदे, श्रेणी 3 चे चार पदे,केंद्र प्रमुखाची आठ पदे ,उच्चश्रेणी मुख्याध्यापक,विषय शिक्षक,पाच पदे, आणि प्राथमिक शिक्षकाचे 36 पदे रिक्त असून शिक्षण विभागातील या रिक्त पदांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याने रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी केले.

यावेळी जि.प.अध्यक्ष कंकडालवार व उपाध्यक्ष पोरेटी यांनी सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातील रिक्त पदे तात्काळ भरू असे आश्वासन आविस पदाधिकाऱ्यांना दिले.