धक्कादायक जिल्ह्यात आज सापडले तब्बल 54 कोरोनाबाधित

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : आज जिल्ह्यात एकाचवेळी तब्बल 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यात 13 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 13 रुग्ण यासह कळंबणीतील 5, कामथे 19, गुहागर 10 आणि दापोलीतील 7 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. बुधवारी सायंकाळी एकाचवेळी 54 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. तर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण मिळू लागल्याने लोकांच्यात ही भीतीचे वातावरण दिसत आहे. तर आरोग्य यंत्रणेवर ही भार वाढणार आहे..

*दखल न्यूज भारत*