पालखी महामार्गसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत- हर्षवर्धन पाटील.

158

 

निरा नरसिंहपुर दि.15 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर ते लुमेवाडी दरम्यान च्या गावातील रस्त्यालगतचे क्षेत्र जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी संपादित होणार आहे. या महामार्गसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत,असे प्रतिपादन राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांनी केले.इंदापूर येथे बुधवारी (दि.15) भूसंपादन शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बारामती विभागाचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाटील बोलत होते.

पालखी महामार्गसाठी भूसंपादित इंदापूर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि रहिवासी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपल्या न्याय मागण्यासाठी निवेदन दिले होते तसेच कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते याविषयी आपले प्रश्न मांडले होते. या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ पुणे जिल्ह्यातील 39 गावांपैकी 22 गावे इंदापूर तालुक्यातील या पालखी महामार्गसाठी भू संपादित आहेत. तालुक्यातील भवानीनगर ते लुमेवाडी असा 73 किलोमीटर रस्ता या संपादनासाठी आहे. एकूण 3044 शेतकऱ्यांचे भूसंपादन यासाठी होणार आहे. त्यांच्या या संदर्भात अनेक महत्वपूर्ण समस्या असून या समस्यांना प्राधान्य देऊन त्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रयत्न झाला पाहिजे. सदर संपादीत होत असलेले क्षेत्र इंदापूर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि रहिवासी यांचे असल्याने त्यांच्या पुढील मागण्यास न्याय मिळावा. ताबेवहिवटी प्रमाणे सर्व संपादित क्षेत्राची मोजणी करून प्रत्यक्ष संपादित क्षेत्र समजावे. चालू अस्तित्वातील रस्ता सोडून भूसंपादनाचा मोबदला मिळावा. पंचनामा, बांधकाम मूल्यांकन रिपोर्ट ( व्हॅल्यूएशन रिपोर्ट ), जॉईंट मेजरमेंट सर्व्ह या सर्व कादपत्रंची उपलब्धता करून देण्यात यावी.फळबागांचे पंचनामे, ( व्हॅल्यूएशन रिपोर्ट ), उपलब्ध करून देणे.रस्ता अलाईमेंट नकाशे उपलब्ध करून देणे. यासारखे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना न्याय द्यावा.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले तसेच यावर त्वरित उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या शिष्टमंडळास सांगितले.

यावेळी संतोष देशमुख,डॉ. सुभाष सावंत, उमेश मेहर, अशोक भोसले, राजेंद्र कुरुळे, अजिनाथ कदम, चंद्रसेन कोरटकर, राजेंद्र निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, उमेश कोकाटे, नवनाथ डाके, शिवाजी तरंगे, शिवाजी शिंदे, देवबा जाधव, रामदास कोरटकर, चंद्रकांत कोकाटे उपस्थित होते.

________________________________

फोटो.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160