CRPF मधील १५ जवानांसह जिल्ह्यातील २ कोरोना बधित आजच्या १७ बाधितांसह जिल्हयात सक्रीय रुग्ण संख्या ११३ झाली

195

 

गडचिरोली – आज जिल्हयात एकूण १७ नवीन कोरोना बाधित सापडले. यामध्ये 113 CRPF बटालीयन धानोरा यांचे गडचिरोली येथील विलगीकरणातील १५ जवानांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील सिरोंचा येथील ३ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह मिळाला ते कुटुंब कर्नाटक येथून जिल्ह्यात आले आहे. आई वडिल निगेटीव्ह आहेत. सद्या त्यांनाही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
भामरागड येथील एक १९ वर्षीय युवक तेलंगणा वरून परतला होता. त्याचा अहवाल रात्री पॉझिटीव्ह मिळाला. याप्रकारे गडचिरोली येथील १५ जवान, १ सिरोंचा येथील लहान मुलगा व भामरागड येथील १ अशा १७ नवीन बाधितांची नोंद आज जिल्हयात झाली.

आज कोरोना बाधित – १७
जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – ९०
सद्या सक्रिय कोरोना बाधित- ११३
मृत्यू – ०१
एकुण बाधित – २०४
सद्या निरीक्षणाखाली असलेले- १९४४
संस्थात्मक विलगीकरणात – १६९५
आज तपासणीसाठी नमुने घेतले- १०३
आतापर्यंत एकूण नमुने तपासणी – ९४४१
दुबार नमुने तपासणी- ५८९
ट्रू नॅट तपासणी – ५४०
RATI टेस्ट – १८७
एकूण निगेटिव नमुने – ८७९६
नमुने अहवाल येणे बाकी – २५६
एकूण प्रतिबंधात्मक क्षेत्र ३५
पैकी सध्या सक्रिय १३ तर २२ बंद केले.