आमदार स्थानिक विकास निधीतून होणार शेनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौदर्यीकरण, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
शेनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सौदर्यी करणासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी मंजूर करण्यात आला असून काल रविवारी या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौदर्यीकरण करण्यात यावे अशी येथील ग्रामस्थांची जुनी मागणी होती. विधानसभा निवडणूकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील सौदर्यीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. आता आमदार होताच त्यांनी आश्वासनाची पुर्तता केली आहे. या कामासाठी स्थानिक विकास निधीतीतून दोन लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. काल या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्र्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शेनगावच्या सरपंच निर्मला मिलमिले, उपसरपंच धूरालाल धांडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. रयतेचे राज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महााराज यांच्या चौकाच्या सौदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देता आला याचा आनंद आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा ही माझी भूमिका असून त्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. छत्रपती शीवाजी महाराज यांच्या राज्यात ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचे काम करण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी याकरीता त्यांनी प्रयत्न केले. त्याचे हे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे विलास वनकर, राकेश पिंपळकर, प्रेम गंगाधरे, चंद्रकांत वैदय, गौरव जोरगेवार, राहूल जेनेकर यांच्यासह ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.