जलवृक्ष चळवळीच्यावतीने शेणाचा केक कापून झाडांचा वाढदिवस शारीरिक अंतर ठेऊन साजरा

138

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जलवृक्ष चळवळीच्यावतीने दि 14 जुलै रोजी गणेश पार्क दर्यापूर येथे शेणाचा केक कापून झाडांचा वाढदिवस शारीरिक अंतर ठेऊन साजरा करण्यात आला एकदा झाड लावले की त्या झाडाकडे पाहायला वेळ मिळत नाही आज लावलेल्या झाडांचे वाढदिवस केले कि त्या झाडांची काळजी घेऊन समृध्द होण्यास मदत होते या अभिनव कार्यक्रमाला तहसिलदार योगेश देशमुख, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गिता वंजारी, डी एफ ओ सुनिल काकडे, बंडूभाऊ हंतोडकर, संजय देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
या सर्वांच्या उपस्थितीत शेणाचा केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा केल्या गेला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन नाविन्यपूर्ण अतिस्तुत्य अनुकरणीय उपक्रम आहे असे मत व्यक्त केले
यावेळी विजय विल्हेकर, माणिक मानकर, मनोज तायडे, मनिष लाजूरकर, विजय लाजूरकर, गजानन देवके, राजेंद्र गायगोले, दिलीप ठाकूर, नाईकसर, प्रविण कावरे, रोशन कट्यारमल ,संदीप गावंडे, भैया भारसाकळे, गजानन देशमुख, अमोल कंटाळे, संघमित्रा खंडारे, मालिनी पाटील, वर्षा अग्रवाल, ज्योती सोमवंशी, सौ गावंडे, सौ तायडे, सिंधु विल्हेकर, विश्वनाथ जामनिक, बबलू गुप्ता, अरविंद नाईक, मनोज राठी, चेतन उजाडे, डॉ सचिन नागे आदींसह जलवृक्षप्रेमी हजर होते