पोलीस स्टेशन येवदा येथील पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सुयोग टोबरे /उपजिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत अमरावती
दर्यापूर- स्थानिक पोलिस स्टेशन येवदा मध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई एजाज खान यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दवाखान्यात जाता जाताच निधन झाले
सविस्तर वृत्त असे की एजाज खान मूळचे राहणार अचलपूर वय 32 वर्षे हे पोलीस स्टेशन येवदा येथे गेल्या तीन वर्षापासून पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते परंतु गेल्या मार्च महिन्यापासूनच त्यांच्या तब्येतीत सतत चढ-उतार चालू होते त्यातच आज दिनांक 15 /7 /2020 ला त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनला कळविण्यात आली
एजाज खान हे एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून परिसरात ओळखले जात होते गरीब लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असत त्यामुळे लोकांमध्ये एक दुखात वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्यामागे आई वडील दोन भाऊ पत्नी व एक छोटी मुलगी असा परिवार आहे.