दापोली एसटी व दुचाकीचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू.

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

दापोली – दापोली शहराजवळील असलेल्या वळणे काजू फॅक्टरीजवळ सकाळी झालेल्या मोटरसायकल व एसटी बसच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मोटरसायकल वरील दोघेजण मृत्यूमुखी पडले. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून दापोली परिसरातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहेत. या अपघातात आई व मुलगा जागीच मृत्यूमुखी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास चालू आहे.

*दखल न्यूज भारत*