माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते माळवाडीचे नूतन उपसरपंच अतुल ढावरे यांचा सत्कार

 

नीरा नरसिंहपुर दिनांक 15 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,  

ग्रुप ग्रामपंचायत माळवाडीच्या उपसरपंचपदी अतुल भगवान ढावरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माधव मोरे, दत्तात्रय पांढरे, सतीश मोरे, बाळासाहेब मोरे, विराज मोरे ,सचिन मोरे उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच राघू मदने आणि उपसरपंच अतुल ढावरे ग्रुप ग्रामपंचायत माळवाडी चा कारभार करीत आहे.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160