Home महाराष्ट्र वाघाचे हल्ल्यात शेतमजूर ठार. परिसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण, शेतकऱ्यांना भयमुक्त शेतीचे कामे...

वाघाचे हल्ल्यात शेतमजूर ठार. परिसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण, शेतकऱ्यांना भयमुक्त शेतीचे कामे करता यावी यासाठी वनविभागाकडून त्वरीत उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा. अशी परिसरातील जनतेची मागणी.

143

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

चंद्रपूर जिल्हा, नागभीड तालुक्यातील गाव सोनूली. गांव आणि शेतकऱ्यांची शेती जंगलव्याप्त असल्याने वन्यप्रान्यांचे सतत आवागमन, अशातच दिनांक- १२/७/२०२० ला सोनूली येथील शेतकरी चंद्रभान नानाजी बोरकर यांचे शेतावर मारोती माधव उईके हा मजूर धानपीकावर औषध फवारणी करीत असता, अंदाजे दुपारी १-०० ते १-३० चे सुमारास बाजूलाच झुडूपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने मारोती उईके याचेवर हमला करून, जागीच ठार मारले. घटणेची माहिती मिळताच, तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी सोनटक्के मॅडम आपल्या सहकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन घटणास्थळी पोचल्या. व प्रेताचा पंचनामा करून, प्रेत शवविच्छेदनासाठी नागभीड येथील दवाखान्यात हलविण्यात आले. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून, मृताचे प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन केले. मृताचे पश्र्चात म्हातारे आई-वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. मृतक हा घरातील एकटाच कमावता व्यक्ती असल्याने त्याचे कुटूंबावर एकप्रकारचे संकटच कोसळले आहे. तेव्हा मृतकाचे कुटुंबाला वनविभागाने त्वरीत आर्थिक मदत करावी. व वाघाचा बंदोबस्त करून, शेतकऱ्यांना दहशतमुक्त वातावरणात शेतीची कामे करता यावी. अशी परिसरातील जनतेची एकमुखी मागणी आहे.

Previous articleपुन्हा फुलणार अवैध दारू विक्रेत्यांचे ओठावर हसू चोरांचा माल खातील आपण सख्खे भाऊ अर्ध्ये तुम्ही अर्ध्ये आम्ही मिळून राज्य शुल्क उत्पात आणि पोलीस प्राशन झाडणार एकमेकांवर फेऱ्या
Next articleमाजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते माळवाडीचे नूतन उपसरपंच अतुल ढावरे यांचा सत्कार