पुन्हा फुलणार अवैध दारू विक्रेत्यांचे ओठावर हसू चोरांचा माल खातील आपण सख्खे भाऊ अर्ध्ये तुम्ही अर्ध्ये आम्ही मिळून राज्य शुल्क उत्पात आणि पोलीस प्राशन झाडणार एकमेकांवर फेऱ्या

 

अतित डोंगरे दखल न्यूज प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा : जगभर कोरोना विषणानुने थैमान घातले. जे जे सरकार-शासन, प्रशासणाकडून हवे होते. ते कोरोना विषाणू करून गेला. सर्वांना नियम,अटी, शर्थीची शिकवणूक करवून कोरोना जाणार आहे. हे सत्य स्विकारावे लागणार आहे.

देश सोडून विदेशात जाणारे मायदेशी परतले. मायदेशातील स्वराज्यत परतले. राज्यातील, जिह्यात एव्हाना प्रत्येक नागरिक स्वगृही पोहचले. देश, विदेशात, आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंडानाऱ्यांना लगाम कसून कोरोना जाणार. कोरोनाचा परिणाम जनजीवणावर चांगला-वाईट होणार आहे.

अवैध मालाची होणारी तस्करी, अवैध समजले जाणारे धंदे यांना मज्जाव, बंदिस्त, धाक, दरारा, वचक लावण्यात शासन,प्रशासन हतबल ठरले. तिथे मात्र कोरिणाने यशस्वी भूमिका बजावली आहे. सर्व काही कोरोना विषाणूने लगाम व बंद करून सोडले.

आता गावपातळीवर मोठ्या प्रमाणात अवैध मोहफुलची गाळप करून ती राजरोशपणे बिंदीक्त विक्री केली जाते आहे. नागरिकांनी यावर अंकुश घालावा. यासाठी गावची गाव पुढे आलीत. पण त्यांना हवे तेवढे यश प्राप्त होऊ शकले नाही.

सरळ अर्थ ढिसाळ शासन आणि प्रशासन असेच मानावयास लावण्यास कोरोनांने बाध्य केले आहे.

किरोना विषाणूचा प्रादुर्भाव, भय, भीती, परतीच्या वाटेवर असतांना अवैध धंदे वाईक आपले हातपाय पसरत असतांना पहावयास मिळत आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे अवैध मोहफुलाची दारू विक्री पुन्हा सुरू होऊन सामाजिक अंतर, मास्क, सेनेटाईजर याचा विसर पाडण्यास होत आहे.

आता गावागावातील अवैध मोहफुल गाळप व विक्री सुरू सुरू झालेली आहे. याचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर होणार असले तरी राज्य शुल्क उत्पात विभाग आणि पोलीस प्रशासन यांचे खिसे अवैध दारू विक्रेते गरम करणार असल्याने यांचेही चेहऱ्यावर हसू फुलतांना दिसणार आहे.

अवैध काम करणाऱ्यांकडून कामाच्या स्वरूपावरून मंथली पूर्ववत सुरू करण्यासाठी त्याला प्राथमिक मुभा दिली गेली आहे. आता सर्वांचे कार्य भरात येताच राज्य शुल्क उत्पात, पोलीस प्रशासन हे दिखाऊपणाची भूमिका राबवून आपण शासनाचे कार्य चोख करीत असल्याचे सांगण्यासाठी त्यांना पकडतील. आपला धाक निर्माण करून स्वतःची *आपली पोळी, अर्धे तुम्ही अर्ध्ये आम्हीच्या* भूमिकेत शेकतील.

प्राप्त सूत्रानुसार मुंडीकोटा पोलीस चौकी अंतर्गत अवैध धंदेवाईकांना मुभा दिली. आता मंथली १००० रुपये ऐवजी २००० मागणी होत आहे. जो मतानुसार मंथली देईल तोच त्याला सूट अन्यथा केश अशी चर्चा मुंडीकोटा चौकी इंचार्ज लाला लोणकर यांचे विषयी सुरू आहे.

अवैध कामात मुभा देणारे केवळ आपकारी आणि पोलीस प्रशासनच आहे असे म्हणणे गैर होईल. यात सर्वच विभागा अंतर्गत कार्याच्या स्वरूपावर चालणाऱ्यांनावर होणार आहे.

कोरोना विषाणूची लागण ही दिशा दर्शक स्वरूप निर्धारित करणारी आहे. ती अशी की, वेळीच त्याची दखल घेतली नाही. तर सर्वानाच त्याची झळ कशी शोसावी लागते. हे दाखवून देणारी आहे. त्यामुळे कोरोना विषाणू माहामारीची साथ रोख थांब होऊ शकेल.

पण प्रशासनातील जबाबदारी निभावणाऱ्यांना लागलेली अवैध मार्गे संपत्ती जमविणा-याना लागलेली भ्रष्ट साथीचे उपाययोजना केली जाईल का ? सामान्य जनता यात भरडणार ते कोणाला तरी दिसेल का ? कोरोना साथीपेक्षाही वाममार्ग रक्कम गोळा करण्याची भ्रष्टसाथ जाईल का ? याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.