घुग्घुस येथील वार्ड क्र.2 मध्ये सार्वजनीक सुलभ शौचालय बनवा युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांची मागणी

171

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस येथील गांधी चौक परिसरात सार्वजनिक सुलभ शौचालय नसल्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांना व नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. घुग्घुस ग्रामपंचायतीच्या वतिने येथे सार्वजनिक सुलभ शौचालय बनविल्यास नागरिकांची समस्या दुर होनार आहे .घुग्घुस वस्तीतील गांधी चौक हा मध्यभागी वसलेला आहे.
त्याकरिता युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व गांधी चौक परिसरातील अंगणवाडीच्या मागे मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटवून त्या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात यावे या करीता युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी ग्रामपंचायत येथे निवेदन देऊन सदर मागणी केली आहे.
निवेदन देते वेळी घुग्घूस शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, शिवसेना उपतालुका प्रमुख गणेशजी शेंडे, उपशहरप्रमुख योगेश भांदक्कर, सुधाकर चिकनकर,अजय जोगी, युवा सेनेचे चेतन बोबडे व समस्त शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.