लुपिन फौंडेशन कडून कुंसुंबा परिसरातील गावांमध्ये वृक्षलागवड

 

राजू हालोर उडाणे धुळे प्रतिनिधी

धुळे ता, उडाणे ( प्रतिनिधी) मोराने ,अकलाड ,बल्हाने,दह्याने या चार गावात लुपिन फाउंडेशन धुळे तसेच BCI प्रकल्पाच्या माध्यमातून कुसुम्बा पियू मधील या चार गावांमध्ये 1000 वृक्षाचीं लागवड करण्यात आली त्यामध्ये साग,कडुनिंब, बांबु या प्रकारची झाडे लागवड करण्यात आली . धुळे जिल्ह्यातील मागील 2 वर्षापासुन पासून श्री. योगेश राऊत (लुपिन फौंडेशन प्रकल्प वेवस्थापक धुळे)श्री.सुनील सैंदाने (BCI प्रकल्प समन्वयक धुळे) श्री अभंग जाधव कुशावर्त पाटील (प्रशिक्षण समनव्यक)यांच्या मार्गदर्शनाखाली व पियू व्यवस्थापक श्री विनोद मासुळे सर यांच्या नियंत्रणाखाली वृषरोपण करण्यात आले व त्यांनी निसर्गाचा होणार ऱ्हास आणि पर्यावरणाचे संतुलन कसे राखावे,जैवविविधता याविषयी माहिती व मार्गदर्शन सदर शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी वर्ग व गावचे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेवक ,ग्रा.सद्स्य तसेच कार्यक्रमाला उपस्थित कृषिमित्र विकास सिसोदे,नितीन चौधरी, राजेंद्र मासुळे,सुनील सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सदर सरपंच व ग्रामसेवक व गावातील ग्रामस्थांनी जैवविविधता टिकवण्यासाठी गावकरी प्रयत्न करू याची ग्वाही त्यांनी दिली.