परीसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुण द्या. पोर्ला वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव याची मागणी.

0
96

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)

(गडचिरोली जिल्हा)

आरमोरी परीसरातील शेतकऱ्यांचे रोवणीचे काम बरेच झाल्याने सध्या रोजगारा अभावी मजुरांणा कामे नसल्याने घरीच राहण्याची वेळ आल्याने मजुरांनी ही समस्या गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांना सांगितले असता त्यांनी जंगल परीसरात भेट देऊन पोर्ला वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदिप यादव यांच्याकडे परीसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुण देण्याची मागणी केली असता. त्यानी कसल्याही प्रकारे विलंब न लावताच परीसरातील मजुरांना वृक्ष लागवड करण्याचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात मोहफुल व टोरी वेचण्या व्यक्तीरीक्त काही दिवस रोजगार हमिचे कामे उपलब्ध होतात त्या नंतर येथिल मजुराना दुसरे कोणतेच कामे मिळत नसल्याने येथिल मजुर वर्ग पावसाच्या दिवसात आपले कृटुबाचा गाडा चालविण्यासाठी धान रोवणी करण्या करीता परराज्यात, जिल्हा बाहेर किंवा जिल्ह्यात इतरत्र जाऊन मजुरु कमित कमि पाच साहा महीण्याचा रक्षण घेऊ शकणार एवढे कमवित होता परंतु या वर्षात देशासह राज्य व जिल्ह्यात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संचारबंदी लागु असल्याने मजुराना आपले रोवणीचे कामे करुण जाता आले नाही परंतु जिल्ह्यातही रोजगाराचे कामे नाही यामुळे शेतीला उसनवार मागुण लावलेला खर्च कोठुन देणार व कुटुंबाचा गाडा कसा चालवणार या विवंचनेतुन परीसरातील मजुरानी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याची भेट घेऊन आम्हाला काहीतरी पावसाळा भर रोजगार उपलब्ध करुण देण्याविषयी बोलले असता घोडाम यांनी मजरासह पोर्ला वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदिप यादव याची सालमारा परीसरातील कम्पारमेट 36,37,39 मध्ये भेट घेऊन सध्या कामधंदे बंद असल्यामुळे मजुरांना काम उपलब्ध करुण द्या अशी मागणी केली असता यावर सकारात्मकता दाखऊन पोर्ला वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदिप यादव यांनी परीसरातील मजुरांना कसलाही विलंब न लावता जोगीसाखरा, सालमारा, चामोशी, वैरागड, रामपुर यासह परीसरातील मजुरांना वृक्ष लागवडीचे काम उपलब्ध करून दिले त्याबद्दल मजुरांनी घोडाम यांचे आभार माणले. या वेळी वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदिप यादव, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम, वनविकास महामंडळाचे सालमारा रेजचे राऊड आफिसर चोले, वनरक्षक मडावी, वनरक्षक चौधरी यासह मजुर उपस्थित होते.