ग्रामपंयतीवर जि. प. सदस्यांच्या शिफारशी नुसार प्रशासकाची नेमणुक करावि- सुभाष गुंडरे ग्रा. प. सदस्य

207

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपणास पत्रातुन कळविण्यात येते की ज्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासकाची नेमणुक करायची आहे ती त्या त्या क्षेत्राच्या जि. प. सदस्यांच्या शिफारशिनुसार करण्यात याव्यात.कारण पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या पेक्षा लोकांसोबत व त्यांच्या संपर्कात जि. प. सदस्य हे जवळ राहतात,त्याच बरोबर त्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत मध्ये कोण व्यक्ती चांगले कार्य करु शकतात हे फक्त त्यांनाच माहित असते. त्याची जाणीव सुध्दा त्यांनाच असते. जि.प.सदस्यांच्या क्षेत्रात येणा-या ग्रामपंचायत मध्ये त्याच क्षेत्राचे जि. प. सदस्य हे योग्य व्यक्तीची निवड करून प्रशासकाची शिफारस ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात यावी आणि ती शिफारस ही अंतिम असावी असे जनमत जिल्ह्यातील जनतेत रूजलेले असते. करीता मा.मुख्यमंत्री साहेब यांना वर्तमान पत्रातुन कळविन्यात येत आहे.जनतेच्या हिताचे व गावाच्या सुधारणेचे कार्य हे चांगले घडण्यास सहकार्य लाभतील, त्याच प्रमाणे गावातील गोर-गरीब व लाचार जनतेस उत्तम न्याय मिळेल आणि शासनाच्या योजनाही मिळतील. करीता मुख्यमंत्री साहेबांनी जन हिताकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या त्या क्षेत्रातील जिल्हा परीषद सदस्यांची शिफारस यादी मागवावी अशी आपणास वर्तमान पत्रातुन विनंती करण्यात येत आहे.