कन्हान मध्ये कोरोना चा विस्फोट;कन्हान ठरले कोरोना चे हाँट स्पाँट नागपुर जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती, त्यांचे भाऊ आणि ड्रायव्हर सह एकुण ८ जण आज कोरोना पाँजिटीव!

1566

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत, नागपुर

कन्हान / नागपुर : १५ जुलै २०२०
नागपुर जिल्हा परिषद च्या अध्यक्षांचे पती हे कोरोना पाँजिटीव निघाल्याचे आज दुपारी १२ वाजेपासून सोशल मीडिया वर मैसेज फिरत आहेत. त्यासंदर्भात आमच्या दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांनी मुख्याधिकारी संदीप छिद्रावार तसेच कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचेशी बातचीत केली. मुख्याधिकारी छिद्रावार यांनी सांगितले की, हो मला ही आताच माहिती मिळाली आहे मी आता कन्हान ला पोहोचत आहे. तिथे पोहोचून मी आपणास या पाँजिटीव पेशंट चे डिटेल्स देतो.
तर दुसरीकडे कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी दखल न्यूज भारत चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांना माहिती दिली की, कन्हान कांद्री आणि टेकाडी या परिसरात एकुण ८ व्यक्ती कोरोना पाँजिटीव आढळले आहेत. जि. प अध्यक्षा चे पती तसेच त्यांचे भाऊ व त्यांचा ड्रायव्हर हे तिघेही पाँजिटीव असुन जि. प. अध्यक्षांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सार्वजनिक जीवनात काम करतांना आता कोरोना चा यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता येत नाही असेही अरुण त्रिपाठी यांनी सांगितले. यासंदर्भात आम्ही या परिसरास प्रशासनाच्या माध्यमातून सील करीत आहोत तसेच यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांना होम कोरोंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांची नावे असलेले मैसेज आज what’s app तसेच फेसबुकवर मागील एक तासांपासून काही लोकांनी पत्रकारांनी शेअर केले.
नागपुर जिल्ह्यातील कन्हान क्षेत्रात सर्वाधिक पाँजिटीव पेशंट आढळल्याने आता कन्हान न नगरपरिषद चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार तसेच पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी तसेच पारशिवनी तहसीलदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हे सर्व जण कोरोना ला आटोक्यात आणण्याचे अतोनात प्रयत्न करीत असुन कोरोना संक्रमण थांबविण्याच्या द्रष्टीने आवश्यक त्या उपाययोजना पण करीत आहेत. हा परिसर सोडियम हायपो क्लोरोईड ची फवारणी करुन सेनिट्राईज केला जात आहे.