शैक्षणिक शुल्का संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी घाटकोपर (प) युवासेनेचे शाळांना निवेदन

0
110

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर :शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कोरोनाच्या महामारीमध्ये पालक-विद्यार्थी यांना शैक्षणिक शुल्का संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या आदेशाने व युवासेना सहसचिव मंदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने युवासेना घाटकोपर (प) विधानसभेच्यावतीने युवासेना विभागअधिकारी अभिषेक मोरे आणि युवासेना,भा.वि.से सर्व पदाधिकारी घाटकोपर(प) विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या शाळांना युवासेनेच्या वतीने सरस्वती विद्यामंदिर, ज्ञानप्रकाश हायस्कूल,स्वामी शामानंद हायस्कूल या सर्व शाळांचे मुख्याध्यापक , प्रमुख अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी युवासेना विधानसभा चिटणीस श्री दत्ताराम रिंगे, उपविभागअधिकारी प्रसाद इंदुलकर, शाखाअधिकारी श्री अविनाश पिंगळे,श्री सतीश कोकाटे शाखा सचिव श्री संदीप कवडे उपशाखा अधिकारी शैलेश कहार त्याचबरोबर शुभम पारखे, युवासैनीक उपस्थित होते.
युवासेनेच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे
१) किमान ह्या शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेमध्ये कोणतेही शुल्क वाढ करू नये.
२) किमान चार ते पाच हप्तामध्ये शुल्क भरण्याची पालकांना मुभा द्यावी.
३) पालकांना फोन द्वारे शुल्क भरण्याची जबरदस्ती करण्यात येऊ नये.
जर शाळा पालक/विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणार असेल तर त्या विरुद्ध युवासेना आपला आवाज उठवेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.