21 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर मधुकरराव अभ्यंकर ग्रामोद्धार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त, कायदेशीर संघर्षाचे फलित

206

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील ग्रामोद्धार शिक्षण संस्थेच्या वादातील प्रकरणात उच्च न्यायालयाने नुकताच निर्वाळा दिला असून याचिकाकर्ता श्री मधुकरराव अभ्यंकर हे ग्रामोद्धार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे
या संस्थेची स्थापना 1981साली करण्यात आली होती 1982 साली मधुकरराव अभ्यंकर यांनी रितसर अर्ज व प्रवेश शुल्क भरुन सभासद झाले तेव्हापासून अभ्यंकर या संस्थेत सदस्य, उपाध्यक्ष व जिवन विकास विद्यालय, अमरावतीचे अध्यक्ष म्हणून तब्बल 19 वर्ष काम केले
एवढा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष एकनाथ गावंडे व सचिव गिरीधर बोरखडे यांनी श्री मधुकरराव अभ्यंकर हे संस्थेचे सदस्य व उपाध्यक्ष असल्याचे नाकारुन गेली 18,19 वर्षाचे संस्थेचे संपूर्ण रेकॉर्ड बदलून खोटे रेकॉर्ड उपधर्मदाय आयुक्त अमरावती यांच्याकडे दाखल केले त्यामुळे श्री मधुकरराव अभ्यंकर यांना नाईलाजाने या अन्यायाविरुद्ध तब्बल 21 वर्ष कायदेशीर लढाई लढावी लागली संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष एकनाथ गावंडे व सचिव गिरीधर बोरखडे यांनी त्यांच्या जिवनात कधीही कायद्याचा आदर न करता अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करण्याचे काम केले
18,19 वर्ष संस्थेच्या कार्यकारिणीच्या निवडणूका न घेणे ,उपधर्मदाय आयुक्त यांच्याकडे संस्थेचे हिशोब सादर न करणे, संस्थेत इतर मान्यवरांचे लोन घेण्याकरिता परवानगी न घेणे, जंगम मालमत्तेची नोंद न करणे, एवढेच नाहीतर शासनाच्या परवानगी शिवाय डीएड कॉलेज चालविणे त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांकडून पैसे उकळणे असे गंभीर प्रकार एकनाथ गावंडे व गिरीधर बोरखडे या महाभागांनी केले असले गंभीर प्रकार संस्थेला हानिकारक असल्यामुळे श्री मधुकरराव अभ्यंकर यांनी सहधर्मदाय आयुक्त यांच्याकडे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 च्या कलम 41 (ड)नुसार याचिका दाखल केली होती त्याचा निकाल 25 जुलै 2007 मध्ये लागून सहधर्मदाय आयुक्त यांनी एकनाथ गावंडे व गिरीधर बोरखडे यांना कायमस्वरूपी निष्कासित केले व उर्वरित सदस्यांना पुढील वर्षी संस्थेत निवडणूक लढविता येणार नाहीत असा निकाल दिला तर श्री मधुकरराव अभ्यंकर हे संस्थेचे सदस्य अथवा विश्वस्त नाहीत असेही निकालात नमूद केले होते
या निर्णयाविरुध्द अभ्यंकर यांनी जिल्हा न्यायालय, अचलपूर येथे अपिल केले होते परंतु अचलपूर न्यायालयाने सहधर्मदाय आयुक्त अमरावती यांचा निकाल कायम ठेवला त्यामुळे जिल्हा न्यायालय अचलपूर यांचेविरुध्द श्री मधुकरराव अभ्यंकर यांनी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपिठ येथे अपिल दाखल केले होते न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकल सदस्यिय पिठासमोर या अपिलावर सुनावणी झाली याचिकाकर्त्यातर्फे ऍड अंजन डे यांनी युक्तिवाद केला
अपिलार्थी श्री मधुकरराव अभ्यंकर यांच्यासह प्रतिवादी गिरीधर बोरखडे यांनी संयुक्तरित्या याचिका दाखल केली होती त्यात प्रतिवादी बोरखडे यांनी श्री मधुकरराव अभ्यंकर हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्याचे मान्य केले होते या मुद्दाकडे ऍड अंजन डे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधत अपिलार्थी श्री मधुकरराव अभ्यंकर हे संस्थेचे हितसंबधी असल्याचा युक्तिवाद केला न्यायालयाने अपिलार्थी आणि प्रतिवादी या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून अपिलार्थी हे संस्थेचे हितसंबधी व्यक्ती आहेत त्यांना कलम 31 (ड)नुसार धर्मदाय आयुक्तांपुढे बदल अर्ज दाखल करता येतो अपिलार्थी हे संस्थेचे सदस्य नाही हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबादल ठराविला अपिलकर्ता श्री मधुकरराव अभ्यंकर हे ग्रामोद्धार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त आहेत असा निकाल दिला
अन्याय सहन करणे उचित नव्हते–श्री मधुकरराव अभ्यंकर
—————————————
या संदर्भात दखल न्युज दर्यापूर तालुका प्रतिनिधीने श्री मधुकरराव अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधला असता अन्याय सहन करणे उचित नव्हते अशी प्रतिक्रिया दिली ग्रामोद्धार शिक्षण संस्थेचा मी 1982 पासून सदस्य आहो संस्थेच्या बिल्डिंग बांधकामासहित सर्वच कामात मी सहकार्य केले, संस्थेच्या मान्यतेसाठी धावपळ केली, मान्यतेसाठी लागणारी कागदपत्रे मी गोळा करुन ती सादर केली या कामात मला माझ्या हितचिंतकानी मदत केली त्यांचे सहकार्य मिळाले, संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी एक खोट लपविण्यासाठी हजार खोट लपविली मी सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता आहो त्यामुळे माझ्यावर झालेला अन्याय सहन करणे उचित नव्हते
श्री मधुकरराव अभ्यंकर