अरविंद बन्सोड हत्याकांडाची सीबीआय चौकशी करिता नागपुर संविधान चौकात तीव्र निदर्शने

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

संविधान चौक / नागपूर: १५ जुलै २०२०
आज नागपूर जिल्ह्य़ातील संविधान चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नरखेड तालुक्यातील अरविंद बन्सोड यांच्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी समता सैनिक दल, ऑल इंडिया पँथर सेना, मानवीय संघर्ष समिती द्वारे तीव्र निदर्शने करण्यात आली.
अरविंद बन्सोड हत्याकांड प्रकरणाची स्थानीय जलालखेडा पोलिसांनी केलेला तपास समाधानकारक नसून, त्यांवर उपविभागीय अधिकारी यांची चौकशी सुद्धा ही आरोपीच्या फेवरमध्ये होण्यासाठी राजकीय दबाव असुन बन्सोड परिवाराला न्याय मिळवून देणारी नाही. तर उलट आरोपींना बचाव करणारी आहे. म्हणून या हत्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी CBI मार्फत करण्यात यावी, आरोपींवर ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा. या मागणी करिता या करिता समता सैनिक दल तर्फे ऍड. आकाश मून, ऍड.स्मिता कांबळे , अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील , विक्की पाटील. तसेच ऑल इंडिया पँथर सेना तर्फे पवन राऊत (नागपूर जिल्हा अध्यक्ष), शुभम गोंडाने (नरखेड तालूका अध्यक्ष) यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.