अलिबाग च्या शिवकन्येला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून ग्रँड मास्टर किताब

173

 

मिथुन वैद्य-अलिबाग

रायगड :- वयाच्या अडीच वर्षातच भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून आपले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या अलिबाग च्या लोणारे गावातील शर्विका जितेंन म्हात्रे हिच्या कामगिरीची आशिया खंडात नोंद झाली आहे.
आशिया बुक ऑफ रेकॉर्ड ने तिला ग्रँड मास्टर हा किताब देवून तिचा गौरव केला आहे,वयाच्या तिसऱ्या वर्षी एवढा मोठा सन्मान मिळवणारी शर्विका ही महाराष्ट्राची एकमेव कन्या ठरली आहे. शर्विका ने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या कलावंतीण सुळका सर करून तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला होता,ह्या गोष्टीची दखल घेत सर्व पुरावे आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिच्या कार्याची दखल घेतली आहे.
शर्विका ला पुढच्या कार्यात अनेक अवघड किल्ले सर करायचे आहेत, गेल्या उन्हाळ्यात ती शंभर दिवसात शंभर किल्ले सर करणार होती परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम रद्द करण्यात आली असे तिच्या पालकांनी सांगितले,यापूर्वी तिच्या गड चढत असताना अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्या होत्या,गूगल पेज वर सुद्धा शर्विका ची सर्व मोहिमेची माहिती पहावयास मिळते.लहान वयात रायगड जिल्ह्याचे नाव रोशन करणाऱ्या चिमुरडी चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दखल न्यूज भारत