कोरोनापासून रक्षणासाठी पानठेले बंद करा- डॉ. अभय बंग

0
279

 

हर्ष साखरे जिल्हा सहाय्यक प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पानठेल्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात खर्रा विक्री जोमाने सुरू आहे त्यामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची साथ आता गडचिरोली जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. खर्राच्या थुंकीमधून कोरोनाचा  विषाणू पसरत असल्याने एकाचे थुंकणे सर्वांसाठी घातक ठरत आहे, असं डॉ. अभय बंग यांनी म्हटलंय.

आम्ही लोकांना, ग्रामपंचायतींना, मुक्तीपथ गाव संघटनांना पानठेला आणि किराणा दुकानदारांना, प्रशासनाला आवाहन करतो कि कोरोना आणिि कॅन्सर पासून रक्षणासाठी तंबाखू सोडा आणि कोरोनाचा प्रसार थांबवा, असं बंग म्हणालेत.