ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट संघटनेची कार्यकारणी घोषित

282

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
यंग चांदा ब्रिग्रेड च्या वतीने ट्रक चालक- मालक ट्रान्सपोर्ट संघटनेची कार्यकारणी घोषित करण्यात आली.चंद्रपुरात तालुक्यात अंदाजित दोन हजाराच्या वर सिंगल पल्ला वाहन व टिपर असून या व्यवसायावर बारा ते तेरा हजार परिवाराचा उदरनिर्वाह चालतो.मात्र या व्यवसायात वाहन भाडे कमी होत आहे व डिझेलचे भाव गगनाला भिडत आहे यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ट्रक चालक मालकावर उपासमारीची वेळ आली आहे या व्यवसायात अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे सिंगल पल्ला वाहन व टिपर चालक मालकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ट्रान्सपोर्ट चालक मालक संघटना कार्यकारणीची स्थापना आ.किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार घोषित करण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्ष म्हणून सैयद अबरार, उपाध्यक्ष सलाउद्दीन शेख,संतोष मस्के, महासचिव ताजु शेख, सचिव सींनु गोस्कुला, अजय आमटे,कार्यकारी अध्यक्ष सानू सिद्धीकी, मिलिंद झिलटे व कोषाध्यक्ष परवेज शेख यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आ. जोरगेवार यांचे हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिग्रेड चे शहर संघटक राजू जोशी, अमोल शेंडे, शरीफ सिद्धीकी, रशीद हुसेन,कलाकार मलारप व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.