जेसीआय अकोट जेसी रेट विंग व रिद्धी क्लीनिक तर्फे औषधांचे मोफत वाटप

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

जेसीआय अकोट जेसी रेट विंग व रिद्धी क्लीनिक भुस्कट मेडिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढव तज्ञण्याच्या उद्देशाने आर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या औषधांचे वाटप मोफत करण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत या कोरोना महामारी च्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप भुस्कट व डॉक्टर किरण भुस्कट यांच्या विवाह वाढदिवस प्रीत्यर्थ त्यांनी गरजूंना स्वखर्चाने मोफत औषधाचे वाटप केले.
यावेळी जेसी संदीप भुस्कट व डॉक्टर किरण भुस्कट यांनी आपण जे काही मिळवलेलं आहे ते समाजाकडूनच मिळवलेलं आहे आज समाजावर संकट आले आहे. अशा वेळी आपण समाजाच्या बाजूने उभे राहून समाजाचे ऋण फेडण्याची ही वेळ आहे त्याकरिता आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून त्यांनी हजारो रुग्णांना आर्सेनिक एल्बम या औषधाचे मोफत वाटप करून तसेच जेसीआय च्या माध्यमातून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे.यावेळी जेसीआय अकोटचे अध्यक्ष पवन ठाकूर. सचिव आनंद लखोटिया,जेसीरेट विंग चेअरपर्सन मंगला गणोरकर,जेसीरेट विंग सचिव रश्मी अडोकार, उपाध्यक्ष नितीन शेगोकार तसेच विवेक गणोरकर ,अनुप गवाने यांची उपस्थिती होती या प्रकल्पाचा फायदा शहरातील शेकडो गरजूंनी घेतला.