महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ जुलै

222

 

प्रतिनिधी
बिंबिसार शाहारे / राहुल उके
दखल न्यूज

भंडारा : महाडिबीटी पोर्टलवर सत्र २०१९-२० चे अर्ज महाविद्यालय स्तरावरुन मंजूर करुन या कार्यालयास पाठविण्याकरीता १७ जुलै २०२० पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तसेच समाज कल्याण कार्यालयात सदर फस्ट इंस्टालमेंटचे अर्ज मंजूर करण्याकरीता २३ जुलै २०२० पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
जिल्हयातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाडिबीटीवर दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज तपासणी करुन मंजूर करावे, अपात्र अर्ज आपल्यास्तरावरुन रद्द करावे. सदर काम प्रथम प्राधान्याने करावे व कोणतेही पात्र विद्यार्थी शैक्षणिक लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.