ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांना संधी द्यावी

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली व संपनार आहेत अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार असुन राजकीय कार्यकर्त्यालाच ही संघी पुन्हा मिळणार आहे.
पत्रकार सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास पात्र व्यक्ती आहे. कारण पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते, त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी
पालक मंत्री व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना”ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या त्या गावातील पत्रकाराची नेमणूक करावी”अशी मागणी पत्रकार संघटनेकडून केली जात आहे. तसेच ज्या गावात पत्रकार नसेल त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी.असिही मागणी होत आहे.