ध्यास समृद्ध, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा व जिल्हा परिषद शाळेच्या जिर्णोद्धाराचा…….. सुसज्जीत इमारतीसाठी आमदार अमोल मिटकरींचा पुढाकार….

0
87

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे
जिल्हा परिषद शाळा,कुटासा येथील शिकस्त वर्गखोल्या पाहून व्यथित झालेले आमदार अमोल मिटकरी यांनी आज कुटासा येथे जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषजी पवार यांना भेट दिली.अस्वच्छतेच्या विळख्यात असलेला शालेय परिसर सर्वांगसुंदर करण्यासाठी सोबत असलेल्या संपूर्ण टीमसोबत पाहणी केली.शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले,
यावेळी माननीय सुभाषजी पवार यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण,अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र,पोस्ट ऑफिस सर्व विभागांचा आढावा घेतला.
भारतवृक्ष क्रांती मोहिमे अंतर्गत दि.१४जुलैला संपूर्ण अकोला जिल्ह्यात निंबोळ्या रोपण करायच्या असल्याने आज माननीय आमदार अमोल मिटकरी व माननीय सुभाषजी पवार यांच्या हस्ते पालकांना निंबोळ्या वाटप करण्यात आल्या तसेच शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी माजी समाजकल्याण सभापती विजयसिंह सोळंके, गटविकास अधिकारी रायबोले साहेब, गटशिक्षणाधिकारी सावरकर साहेब,विशाल राजे बोरे,शाम राऊत,इंजिनिअर अमोल पाटील,अमोल काळणे,स्विय सहाय्यक वानखडे,केंद्रप्रमुख होपळ सर,कोटेश्वर संस्थानचे संचालक मंडळ, ग्रामसेवक फुलारी ,हुसेनखा पठाण सर्व शिक्षक,अंगणवाडी सेविका, डॉक्टर, नर्स, गावातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.