चर्मकार समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर

174

 

वणी: परशुराम पोटे

चर्मकार समाजातील चप्पल व गटई कारागीरांना त्वरित अार्थिक मदत मिळावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला केलेल्या आरोपींना कठोर शासन मिळावे यासाठी “राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभाग,व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर लॉकडावूनमूळे चर्मकार गटाई कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे,म्हणून शासनाने त्यांना आर्थिक मदत घ्यावी. व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील राजगृह वाचनालयाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी यासाठी वणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभागातील पदाधिकारी व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच चे सदस्य उपस्थितीत होते.